विवाह नोंदणी ऑनलाईन करणे बंधनकारक

आता विवाहोत्सुक मंडळींना विवाहाच्या नोंदणी वगैरे प्रक्रियेसाठी आपला वेळ दवडण्याची गरज नाही. नोंदणी व मुद्रांक विभागाने विवाह नोंदणी घरबसल्या ऑनलाईन करण्याचे बंधनकारक केले आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागाचे महत्वाचे पाऊल

नोंदणी उपमहानिरीक्षक आणि मुद्रांक उपनियंत्रक, कोकण विभाग अ.अ.यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार आता १ ऑगस्टपासून विवाहाची नोटीस केवळ ऑनलाईनच स्वीकारण्यात येणार आहे. विशेष विवाह नोंदणीकरीता सध्या वर आणि वधू यांना विवाह अधिकाऱ्याकडे नोटीस देणे व नंतर विवाह संपन्न करणे. अशा दोन कारणांसाठी प्रत्यक्ष जावे लागते.

यापैकी पहिली म्हणजे नोटीस देण्याची प्रक्रिया १ नोव्हेंबर २०१७ पासून ऑनलाईन पूर्ण करण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. याची लिंक देखीलwww.igrmaharashtra.gov.in  देण्यात आली आहे. मात्र आता ही प्रक्रिया केवळ ऑनलाईनच करणे आता नव्या निर्णयानुसार बंधनकारक राहील.

प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयातील एका दुय्यम निबंधकास त्या जिल्ह्यासाठी विवाह अधिकारी घोषित करण्यात आले आहेत. मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विवाह अधिकारी आहेत. या विभागाने दस्त नोंदणी प्रमाणेच विशेष विवाह नोंदणी प्रक्रिया देखील संगणकीकृत केली आहे.

विवाह अधिकारी कार्यालयात आल्यानंतर आवश्यक ती माहिती संगणकात भरण्यात पक्षकारांचा वेळ वाया जाऊ नये किंवा चुका होऊ नये म्हणून आपली डाटा एन्ट्री आपणच करण्याची सुविधा नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*