सायबर चोरट्यांचा शास्त्रज्ञालाच गंडा

सामान्यांना ऑनलाइन गंडा घालणाऱ्या सायबर चोरट्यांनी थेट राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान संस्थेच्या (एनआयआरआरएच) शास्त्रज्ञांचीच फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळवून लाखोंची ऑनलाइन खरेदी केली. याप्रकरणी परळ येथील भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार डॉ. राहुल गजभिये हे “एनआयआरआरएच’मध्ये शास्त्रज्ञ “सी’ पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या नावावर एक संशोधन पेटंटही आहे. सध्या ते एका संशोधनासाठी ऑस्ट्रेलियात वास्तव्याला आहेत. 13 जून 2017 ला डॉ. राहुल ऑस्ट्रेलियात असताना त्यांना अनोळखी क्रमांकावरून दूरध्वनी आला होता. त्या व्यक्तीने बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून डॉ. राहुल यांच्याकडे क्रेडिट कार्डची माहिती मागितली.

त्या वेळी संशोधनाच्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांनी माहिती देणे टाळले. त्यानंतर चोरट्यांनी पुन्हा 19 जूनला त्यांना दूरध्वनी करून सुरक्षा कोडची माहिती मागितली. वारंवार येणाऱ्या दूरध्वनींमुळे अखेर डॉ. राहुल यांनी त्या व्यक्तीला बोलण्याच्या ओघात क्रेडिट कार्डची माहिती दिली. त्यानंतर काही तासांत राहुल यांच्या क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन खरेदी झाल्याचे ई-मेल त्यांना मिळाले. त्यांनी तत्काळ बॅंकेच्या हेल्पलाइनला दूरध्वनी करून कार्ड ब्लॉक करण्यास सांगितले. मात्र तोपर्यंत सायबर चोरट्यांनी लाखोंची खरेदी केली होती.

ऑस्ट्रेलियात कायदेशीर विचारविनिमय केल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिस आयुक्त व मुंबई पोलिसांकडे ई-मेलद्वारे याप्रकरणाची तक्रार केली.

ई-मेलद्वारे जबाब
शास्त्रज्ञ गजभिये मार्च 2018 मध्ये मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे ई-मेलद्वारेच त्यांनी जबाब पाठवला असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात सायबर पोलिसांची मदत घेतली जात आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

News Thanks From :http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-cyber-crime-83102

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*