काश्‍मीरमधील तरुणाने बनवले फेसबुकप्रमाणे ‘काशबुक’

Social media ban in Kashmir: 16-year-old develops 'KashBook'

काश्‍मीरमधील अस्थिर परिस्थिती तेथे वेळोवेळी फेसबुक, व्हॉटसऍप आणि ट्‌विटरसारख्या सोशल मिडिया माध्यमांवर बंदी आणली जाते. मात्र, यावर मात करण्याचा प्रयत्न एका काश्‍मीरमधील सोळा वर्षाच्या तरुणाने केला असून काश्‍मीरमधील युवकांना एकत्र आणण्यासाठी त्याने Kashbook तयार केले आहे.

दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या काश्‍मीरमधील सोळा वर्षाच्या झेयन शफीक नावाच्या तरुणाने ही साईट तयार केली आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांच्याकडून प्रेरणा घेत ही साईट तयार झेयनने ही साईट तयार केली आहे. Kashbook.com ही फेसबुकसदृश सोशल साईट असून ही साईट म्हणजे ‘काश्‍मीरचे स्वत:चे सोशल नेटवर्क’ असल्याचा दावा करण्यात येत आहे. झेयनने त्याचा 19 वर्षांचा मित्र उझैर जानसोबत 2013 पासून या साईटवर काम करण्यास सुरुवात केली होती. अलिकडच्या काळात जम्मू-काश्‍मीरमधील सोशल मिडियावर वेळोवेळी बंदी घालण्यात येते. या पार्श्‍वभूमीवर झेयनने काही महिन्यांपूर्वीच ही साईट पुन्हा नव्याने सुरू केली आहे. अल्पावधीतच हजारो युजर्स या साईटकडे आकर्षित होत असल्याचे वृत्त आहे.

News : http://www.esakal.com/sci-tech/social-media-ban-kashmir-16-year-old-develops-kashbook-46287

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*