महाबँकेची जीएसटी भरणा सेवा सुरू

बँक ऑफ महाराष्ट्र अर्थात महाबँकेने जीएसटी भरणा सेवा सुरू केली आहे. याचा लाभ बँकेचे ग्राहक व खातेदार तसेच अन्य लोकही घेऊ शकतील. या सेवेमुळे व्यावसायिक, कंपन्या, भागीदारी कंपन्या तसेच प्रायव्हेट आणि पब्लिक लिमिटेड कंपन्यांना थेट सरकारकडे जीएसटी भरण्यासाठी सुविधा निर्माण झाली आहे.

यासाठी जीएसटीदात्याला जीएसटीएन (जीएसटी नेटवर्क) पोर्टलद्वारे चलन तयार करावे लागेल आणि देयकांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र या पर्यायाची निवड करावी लागेल. यामुळे डिजिटल माध्यमातून कॉर्पोरेट आणि रिटेल इंटरनेट बँक सेवांच्या मंचावरून सर्व देयकांचा भरणाही करता येणार आहे.

व्यापारी आणि बँकेचे ग्राहक यांच्याकडे जीएसटी भरण्यासाठी बँकेने पुढील तीन पर्याय दिले आहेत –

– ओव्हर द काउंटर (ओटीसी) ः

ग्राहक आणि बँकेचे ग्राहक नसलेल्या लोकांना महाबँकेच्या शाखांमधून जीएसटीसाठी चलन काउंटरवर प्राप्त होईल. ग्राहक जीएसटीएन वेबसाइटद्वारे चलन तयार करू शकतात आणि त्याची प्रत्यक्ष प्रत घेऊन शाखेत येऊन रक्कम भरू शकतात.

– रिटेल नेट बँकिंग कस्टमर ः

नोंदणीकृत जीएसटी ग्राहक जीएसटीएनच्या वेबसाइटवरून चलन काढू शकतो आणि ई-पेमेंटचा पर्याय निवडू शकतो. इंटरनेट बँकसेवांचा पर्याय निवडल्यावर ग्राहक बँक ऑफ महाराष्ट्रच्या इंटरनेट बँकिंगचा पर्याय निवडू शकतात. रिटेल किंवा कॉर्पोरेट यापैकी पर्याय निवडून लॉगइन प्रक्रिया पूर्ण केल्यावर वापरकर्ते जीएसटी चलनची रक्कम भरू शकतो. हीच प्रक्रिया कुठल्याही व्यापाऱ्यासाठीही सारखीच आहे.

– कॉर्पोरेट नेट बँकिंग कस्टमर ः

एखाद्या वेळेस कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंगअंतर्गत सध्याच्या सेवा वापरून ग्राहक जीएसटीएन पोर्टलवर चलन काढू शकतात आणि नेट बँकिंगद्वारे रक्कमही भरू शकतात.

हेल्पलाइन

बँक ऑफ महाराष्ट्रने जीएसटीविषयक हेल्पलाइनची निर्मिती केली आहे. ही हेल्पालइन सर्व राज्यांसाठी समान असेल. कुठल्याही प्रश्नांसाठी ग्राहक 1800-233-4527 या टोलमुक्त क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

जीएसटी जमा करण्यासाठी विस्तारीत तंत्रज्ञानावर आधारित सेवा आणि बँक शाखा अधिकृत झाल्या आहेत. `एक कुटुंब एक बँक’ या तत्त्वानुसार हा उपक्रम राबवण्यात आला आहे. ही नवी डिजिटल सुविधा आमच्या विस्तारित शाखांच्या नेटवर्कसह जोडली गेली आहे.

रवींद्र मराठे, सीईओ व व्यवस्थापकीय संचालक, बँक ऑफ महाराष्ट्र

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*